Nipani News : निपाणी तालुक्यात गुरुवारी दिवसभर तर शहरात दुपारपर्यंत वीजपुरवठा राहणार खंडित

power cut
power cutPudhari
Published on
Updated on

निपाणी : पुढारी वृत्तसेवा निपाणी शहरात उद्या गुरुवार दि.२५ रोजी दुपारपर्यंत तर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसभर वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती हेस्काॅमचे मुख्य अभियंता निखील दुग्गानी व शहर अभियंता अक्षय चौगुला यांनी दिली.

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून याकाळात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी पुर्वतयारी व दुरुस्तीची कामे आज दिवसभर केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने समाधी मठ, कोगनोळी, खडकलाट, जत्राट, बेनाडी या विद्युत पुरवठा केंद्रातील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा स. १० ते २ तर ग्रामीण भागात स. १० ते ६ या वेळेत दिवसभर वीजपुरवठा खंडीत राहणार आहे. तरी उद्योजक, व्यवसायक व ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news