Nipani Police Transfer : निपाणी शहरचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांची मुधोळला बदली, गंगाप्पा पुजेरी नवे उपनिरीक्षक

सदलगा-चिकोडीतही खांदेपालट; पाच जिल्ह्यांतील ४२ उपनिरीक्षकांच्या बदल्या; IGP संदीप पाटील यांचे आदेश
Nipani Police Transfer : निपाणी शहरचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांची मुधोळला बदली, गंगाप्पा पुजेरी नवे उपनिरीक्षक
Published on
Updated on

निपाणी : निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांची मुधोळ येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी जमखंडी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गंगाप्पा पुजेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस विभागात शुक्रवारी सायंकाळी पाच जिल्ह्यांतील ४२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आयजीपी संदीप पाटील यांनी काढले.

त्यामुळे या आदेशानुसार सदलगा व चिकोडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकांचीही खांदेपालट झाली आहे. चिकोडीचे उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली यांची सदलगा येथे, तर सदलगा येथील उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांची चिकोडी येथे बदली करण्यात आली आहे. कुडची पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकपदी कोनकेरी (विजापूर) येथील सुरेश मंटूर यांची नियुक्ती झाली आहे. अंकली पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकपदी लक्ष्माप्पा अरी, तर संकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल नाईक यांची यमकनमर्डी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये निपाणी शहर पोलीस ठाण्याचे शिवानंद कार्जोळ हे सुमारे दोन वर्षांपूर्वी रुजू झाले होते. त्यांच्या जागी नियुक्त झालेले गंगाप्पा पुजेरी हे हुक्केरी तालुक्यातील रहिवासी आहेत. उपनिरीक्षक लक्ष्माप्पा अरी आणि सुरेश मंटूर यांनी यापूर्वी निपाणी सर्कलमधील खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले सर्व उपनिरीक्षक लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

नेर्ली-बिरादार यांची ‘खांदेपालट’

चिकोडी-सदलगा पोलीस ठाण्यातील बदली लक्षवेधी ठरली आहे. चिकोडीचे उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली यांची सदलगा येथे, तर सदलगा येथील शिवकुमार बिरादार यांची चिकोडी येथे नियुक्ती झाली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी परस्परांच्या कार्यक्षेत्रात पदभार स्वीकारत ‘खांदेपालट’ केल्याने पोलीस विभागात या बदलीची विशेष चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news