

निपाणी : सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणार्या दोघांवर निपाणी शहर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सीपीआय बी. एस. तळवार यांनी दिली. अनिकेत गुरुनाथ दिवटे (रा. साखरवाडी, निपाणी व शाहिद समद नगारजी (रा. भीमनगर, तिसरी गल्ली) अशी कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत.
हे दोघेजण गांजा ओढत असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार शहर पोलिसांनी दोघांनाही रंगेहाथ पकडून त्यांच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल केल्याची माहिती सीपीआय तळवार यांनी दिली.