

निपाणी; पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावर हॉटेल अमरनजीक साखर वाहतूक ट्रक रस्त्यातच पलटी झाल्याने सुमारे चार तास वाहतूक विस्कळीत झाली.हा अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला घटनेची नोंद शहर पोलीस झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, ट्रकचालक अमिन अय्यर (वय २८ रा. तामिळनाडू) हा मुंबईकडे साखर भरून जात होता.दरम्यान घाटात वळणावर हा ट्रक आला असता चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्त्यातच पलटी झाला.यावेळी ट्रकमधील साखर पोती रस्त्यावर विखरून पडली.दरम्यान बेळगावहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सुमारे ४ तास विस्कळीत झाली.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांच्यासह रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमी चालक अमिन अय्यर याला उपचारासाठी सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. अपघातग्रस्त ट्रक रात्री उशिरा बाजूला करून मुख्य मार्गावरून वाहतूक पोलीस व रस्ते देखभाल कंपनीच्या प्रशासनाने सुरळीत करून दिली.