Death by hanging: निपाणीत नवविवाहितेने गळफास घेत जीवन संपवले

सासरकडून मानसिक छळाचा आरोप; सासूविरोधात फिर्याद दाखल
Death by hanging: निपाणीत नवविवाहितेने गळफास घेत जीवन संपवले
Published on
Updated on

निपाणी : सासरकडून होणारा मानसिक छळ सहन न झाल्याने लग्नाच्या ३९ व्या दिवशी नवविवाहितेने गळफास घेउन जीवन संपवले. गुरुसिद्धवा प्रशांत हागरगी (वय ३६, रा. हरीनगर १ ली गल्ली, निपाणी) असे तिचे नाव आहे. सदर घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली असून याबाबत गुरुसिद्धवा यांच्या बहिणीने सासूविरोधात फिर्यादी दिली आहे.

गुरुसिद्धवा हिचा विवाह प्रशांत हागरगी याच्याशी दि. २१ एप्रिल रोजी निपाणीत झाला होता. दरम्यान, विवाहनंतर पंधरा दिवसांनी तिच्या सासू महानंदा अशोक हागरगी यांनी तिचा मानसिक छळ चालवला. गुरुसिद्धवा हिने याबाबतची माहिती आपल्या माहेरी कुटुंबीयांना दिली होती. त्‍यानंतर सासू-सुनेमधील वाद मिटवण्यात आला होता. तरीसुद्धा गुरुसिद्धवा हिचा मानसिक छळ सुरूच होता. गुरुवारी संध्याकाळी गुरुसिद्धवा हिने पती प्रशांत हा कागल एमआयडीसी येथे नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास साडीने गळफास घेतला.

तत्पूर्वी तिने रात्री अकाराच्या सुमारास आपल्या भाचीला मी जीवाचे बरेवाईट करून घेणार असल्याचा मेसेज मोबाईलवर केला होता. दरम्यान, पहाटे ४ च्या सुमारास भाचीने तो मेसेज बघून गुरुसिद्धवा हिच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याची प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याने पती प्रशांत याच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार प्रशांतने घरच्यांशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली असता नेमका प्रकार उघडकीस आला.

याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार बसवराज नेर्ली यांनी पाहणी केली. गुरुसिद्धवा हिची बहीण सुनंदा दुंडाप्पा उप्पार (रा. विजापूर) हिने सासू महानंदा हागरगी हिच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news