Nipani accident: दुचाकीवरून पडून एकजण ठार

निपाणीजवळ अपघातात : मृत बटकणंगले येथील
accident
accidentfile photo
Published on
Updated on

निपाणी : दुचाकीवरील ताबा सुटल्‍याने खाली कोसळून एकजण ठार झाल्‍याची घटना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी हद्दीत मुश्क धाब्याजवळ घडली. प्रकाश भागोजी शिंदे (वय ५०, रा. बटकणंगले ता. गडहिंग्लज) असे मृताचे नावे आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी झाला. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात झाले आहे.

याबाबतची माहिती अशी की, प्रकाश शिंदे हे कुटुबियांसमवेत मुंबईला वास्‍तव्‍याला होते. ते महापालिकेतून सुरक्षा रक्षक पदावरून निवृत्त झाले होते. मुंबई येथून दुचाकीवरून ते काही कामानिमित्त आपल्या मूळगावी येत होते. यमगर्णी हद्दीतील हॉटेल मुश्क धाब्याजवळ ते आले असता त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्‍याने खाली कोसळून जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत याची माहिती बसवेश्वर चौक पोलिसांनी दिली. सहाय्यक उपनिरीक्षक एस. आय. कंबार, हवालदार लक्ष्मण कुदरी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृताची ओळख पटवली व याची माहिती कुटुंबीयांनी दिली. याबाबत प्रकाश यांच्या पत्नी कांचन शिंदे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक कंबार करत आहेत. त्‍यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news