Nipani Municipality : सोमवारपर्यंत थकबाकी न भरल्यास गाळ्यांना कुलूप

निपाणी नगरपालिकेचा नोटिसीद्वारे इशारा : महसूल अधिकारी सुनील कांबळे यांची माहिती
Nipani Municipality
निपाणी : गाळेधारकांना नोटीस देताना पालिकेच्या महसूल विभागाचे अधिकारी विवेक जोशी, सुनील कांबळे, वाघेला.Pudhari
Published on: 
Updated on: 

निपाणी : निपाणी नगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी असलेल्या काही व्यापारी गाळेधारकांना भाडे थकबाकी त्वरित भरावी यासंदर्भात नोटीस बजावली आहे. सोमवार पर्यंत थकबाकी न भरल्यास गाळ्यांना कुलूप लावण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असल्याची माहिती महसूल अधिकारी सुनील कांबळे यांनी दिली.

शहरातील मुरगूड रोडवर टाइल्स व फरशी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून पालिकेचा कर थकीत आहे. शुक्रवारी सायंकाळी पालिकेच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या टाइल्स व फरशीविक्रेत्यांना भेटून त्वरित कर भरा अन्यथा सोमवारी आपल्या दुकानांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला. तसेच निपाणी नगरपालिकेच्या मालकीच्या अशोक नगर येथील मिनी फुटबॉल स्टेडियम बाहेरील गाळेधारकांना गाळ्याचे भाडे भरा अशा नोटीसा दिल्या आहेत. बेळगाव नाका परिसर तसेच निपाणी नगरपालिकेजवळ पालिकेच्या व्यापारी गाळे भाडे अनेकांनी थकीत ठेवले आहे. त्यांनाही नोटीस देण्यात आली आहे.

निपाणी पालिकेच्या गाळ्यांचा २०१० पासून लिलाव झालेला नाही. शहरात पालिकेचे ४७० छोटे मोठे व्यापारी गाळे आहेत. या गाळेधारकांना वेळोवेळी अल्पशी भाडेवाढ करून मुदत वाढवण्यात आली होती. या व्यापारी गाळ्यांची मुदत २०२२ मध्येच संपली आहे.

शहरात पालिकेच्या मालकीच्या शहरातील चाटे मार्केट मध्ये ८५, भाजी मार्केट मध्ये २५, लोकमान्य टिळक उद्यान पश्चिमेकडील बाजू व उत्तरेकडे ५९, मुनिसिपल हायस्कूल समोर, बेळगाव नाका १४, जुना मोटार स्टॅन्ड ९, जुना पी बी रोड १२ , गांधी चौक ४, दत्त मंदिर जवळ ३ असे व्यापारी गाळे आहेत. तसेच आय डी एस एम टी योजनेतून अशोक नगर व जुना मोटार स्टॅन्ड येथे लाखो रुपये खर्चून व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. अनेक गाळेधारकांनी आपले गाळे दुसऱ्यांना जादा भाड्याने दिले आहेत. त्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

काही गाळेधारकांचे निधन झाल्याने सदरचा गाळा परस्पर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या व्यक्तीस हस्तांतर केला आहे. त्याची भाडे वाढ मात्र झालेली नाही. यामध्येही पालिकेचा तोटा होत आहे. लवकरात लवकर गाळेधारकांचा प्रश्न निकालात काढण्यात आलेला नाही. खाजगी गाळेधारकाने देखील पालिकेचा कर भरलेला नाही. त्यामुळे पालिकेने आता कर भरणा वसुली मोहीम जोमाने हाती घेतली आहे. पालिकेचे महसूल अधिकारी विवेक जोशी, लहू मधाळे, बाबू खातेदार, वाघेला यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.