Nipani crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संशयितासह मदत करणाऱ्या महिलेची जेलमध्ये रवानगी
 Minor Girl Assault Case
Minor Girl Assault CasePudhari
Published on
Updated on

निपाणी : एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणात संशयितासह त्याला मदत करणाऱ्या महिलेस बसवेश्वर चौक पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांची रवानगी हिंडलगा जेलमध्ये केल्याची माहिती सीपीआय बी. एस. तळवार यांनी दिली. सोहेल सलीम शेख व यास्मीन उजेर अन्सारी (रा. दोघेही, निपाणी) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, 10 रोजी दुपारी 12.30 वाजता यास्मिन उजेरा अन्सारी या महिलेने सदर अल्पवयीन मुलीला सोहेल सलीम शेख याच्याकडे पाठवले. पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही सोहेल शेखने सदर मुलीला आमिष दाखवत कारमधून इचलकरंजी येथील एका लॉजमध्ये नेेले. तेथे तिला अमली पदार्थ मिसळलेले शीतपेय देऊन अत्याचार केला. यास्मिन उजेरा अन्सारी व सोहेल सलीम शेख या दोघांनी या प्रकरणाची माहिती कोणाला दिलीस तर जीवे मारण्याची धमकीही सदर मुलीला दिली.

दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीच्या आधारे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार यांच्यासह पोलिसांनी तपास करत वरील दोघांनाही अटक करून निपाणी न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने दोघांचीही रवानगी हिंडलगा जेलमध्ये केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news