Halsiddhanath Yatra : हालसिद्धनाथ यात्रेची उत्साहात सांगता

भंडाऱ्याची अखंड उधळण : पाच दिवसांत लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन
Halsiddhanath Yatra
Halsiddhanath Yatra
Published on: 
Updated on: 

निपाणी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथ यात्रेची शुक्रवारी सायंकाळी ६ वा. मानकरी, पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेल्या पाच दिवसापासून सुरू असणाऱ्या या यात्रेत अनेक धार्मिक कार्यक्रम, ढोलवादन, वालंग, गजीनृत्य, बकरा खेळणे आदी कार्यक्रम झाले.

बुधवारी पहाटे नाथांची पहिली व गुरुवारी पहाटे दुसरी भाकणूककार भगवान डोणे (महाराज) यांचे पुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी तर घुमट मंदिर येथे तिसरी अखेरची भाकणूक भगवान डोणे महाराज (वाघापुरकर) यांनी कथन केली. गेल्या पाच दिवसात या यात्रेसाठी लाखावर भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. खडक मंदिरात गुरुवारी उजाडता शुक्रवारी पहाटे नाथांची ४ ते ६ या वेळेत दुसरी तर यानंतर घुमट मंदिर येथे सकाळी ९.२५ ते ११.३० या वेळेत तिसरी भाकणूक झाली.

गुरुवारी दिवसभर महानैवद्याचा कार्यक्रम व शुक्रवारी सकाळी घुमटातील भाकणूक झाल्यानंतर सायंकाळी ६.३० वा.भाकणूककार डोणे पिता-पुत्र यांच्या हस्ते कर तोडून या यात्रेची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी वालंग कार्यक्रम झाला. सायंकाळी ५.३० वा. उत्सवस्थळी ढोलवादन व अखंड भंडाऱ्याची उधळण झाली. त्यानंतर नाथांच्या दोन्ही पालख्यांची व सबिना सोहळ्याची हालसिद्धनाथ व महालक्ष्मी मंदिर प्रदक्षिणा झाली. ७ वा. वाड्यातील मंदिरात नाथांची मूर्ती स्थानापन्न झाली. त्यानंतर कुर्ली येथील देवाची पालखी सोहळा मार्गस्थ झाला. गेल्या पाच दिवसापासून सुरू असणारी यात्रा सुरळीत पार पडली. यासाठी यात्रा कमिटी, पोलिस व ग्रा. पं. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, पुजारी, मानकरी, ग्रामस्थ या सर्वांनी सहकार्य केले. या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्रप्रदेश या राज्यातील भाविक भाकणुकीसह दर्शनासाठी आप्पाचीवाडीत येथे लाखोंच्या संख्येने आले आहेत. त्यामुळे यंदा भाविकांचा महापूर लोटला होता.

सलग सहाव्यावर्षी भाकणूक

काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या हालसिद्धनाथांच्या भाकणुकीला या यात्रेत मोठा मान आहे. दरवर्षी नाथ आपल्या भाकणुकीतून भक्तांना सावध करत पुढील भविष्य कथन करतात. यंदा सलग पाचव्यावर्षी शनिवारी व रविवारी पहाटे पहिली व दुसरी भाकणूक भगवान डोणे, महाराज यांचे पुत्र सिद्धार्थ डोणे, महाराज यांनी सलग सहाव्यावर्षी भाकणूक कथन केल्याने याची उत्सुकता भाविकात लागून होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.