Nipani Sugarcane Fire : हुन्‍नरगीत पाच एकरांतील ऊस जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे घटना; ७ लाखांचे नुकसान
Nipani Sugarcane Fire : हुन्‍नरगीत पाच एकरांतील ऊस जळून खाक
Published on: 
Updated on: 

निपाणी : हुन्‍नरगी येथे पाच शेतकऱ्यांच्या मालकीच्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

याबाबतची माहिती अशी की, हिसूब मुल्ला, शब्बीर मुल्ला, युनूस मुल्ला, मुबारक मुल्ला, लक्ष्मी हिरेकोडी यांनी पाच एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली आहे. मंगळवारी दुपारी शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागली. वाळलेला पाला व वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशामक दलाला पाचारण केले. निपाणी अग्‍निशमन दलाचे निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह महेश माळगळी, संजू दळवाई, विलास नाईक, एस. आय. खिचडी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

मात्र, तोपर्यंत पाच एकरांतील ऊस आणि ठिबक सिंचन साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेत सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news