Nipani Crime | कर्नाटकासह महाराष्ट्रात दुचाकी चोरी, निपाणीतील युवक गजाआड: कोल्हापूर, सातारा, मुंबई येथील १० दुचाकी जप्त

दुचाकी चोरीसाठी राज्यांच्या सीमा पार
Nipani Crime
जप्त करण्यात आलेल्या दुचाकींसमवेत सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार शेजारी कर्मचारी वर्ग. आरोपी राहुल मुचंडी
Published on
Updated on

निपाणी : दुचाकी चोरी करून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या निपाणीतील युवकाला बसवेश्वर चौक पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. राहुल सुहास मुचंडी (वय २६) रा. खरी,कॉर्नर,निपाणी असे त्याचे नाव आहे.यावेळी त्याच्याकडून ४ लाख ६० हजार रू.किंमतीच्या तब्बल १० दुचाकी जप्त केल्या. यामध्ये त्याने मागील वर्षभरात निपाणी शहरासह महाराष्ट्रातील विविध भागांतून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, राहुल याला मंगळवारी दुपारी लखनापूर गावच्या हद्दीतील मधुबन रेसिडेन्सीजवळ राहुलला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्याकडे चोरीच्या विविध कंपन्यांच्या दुचा5 आढळून आल्या.पोलिसांनी त्या जप्त करून त्याची कसून चौकशी केली.

Nipani Crime
Nipani Crime : निपाणीत गर्दीचा फायदा घेत ५ लाख लुटण्याचा प्रयत्न; बॅग घट्ट पकडल्याने चोरट्यांचा डाव फसला

चौकशीत राहूल याने आपण मागील वर्षभरात निपाणीसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि धाराशिव जिल्ह्यांतून दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली.त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० दुचाकी जप्त केल्या या प्रकरणी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जप्त केलेल्या दुचाकीची किंमत ४ लाख ७० हजार रुपये आहे.दरम्यान राहुल याने दुचाकींची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता का ? तसेच चोरीच्या घटनांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई जि.पो.प्रमुख के. रामराजन,अतिरिक्त जि. पो. प्रमुख आर. बी. बसरगी, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार एम. ए. तेरदाळ, मारूती कांबळे, राजू दिवटे, राकेश मदने, प्रशांत कुदरी, रामगोंडा पाटील यांनी केली. यासाठी तांत्रिक विभागाचीही मदत घेण्यात आली.

वर्षभरात चोरीचा सपाटा ; एका वर्षात अनेक ठिकाणी हात साफ

पोलिसांच्या चौकशीत राहुल याने मागील वर्षभरात निपाणी शहरासह कोल्हापूर, सातारा आणि धाराशिव जिल्ह्यांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने तो त्यांची विल्हेवाट लावत होता.त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या तब्बल १० दुचाकी जप्त केल्या असून, त्यांची किंमत सुमारे ४ लाख ७० हजार रुपये आहे. विशेष म्हणजे शहरातील दुचाकी चोर युवकाला पोलिसांनी अटक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news