Dr. Babasaheb Ambedkar statue: निपाणी भेटीच्या शताब्दीनिमित्त साकारणार बाबासाहेबांचा घोड्यावर बसलेला पुतळा

निपाणीकरांचा निर्धार : पहिल्या भेटीला शंभर वर्षे पूर्ण; अतूट नाते, सात वेळा भेट
Dr. Babasaheb Ambedkar statue
निपाणी भेटीत दत्तोबा कराळे यांच्या घोड्यावर बसून सवारीचा आनंद घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर. (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on
राजेश शेडगे

निपाणी : डॉ. आंबेडकर यांची आज 135 वी जयंती सर्वत्र साजरी होत असताना त्यांच्या निपाणी भेटीचीही शताब्दी पूर्ण होत आहे. उल्लेखनीय म्हणजे आंबेडकरांनी कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणीला सात वेळा भेट दिली होती. पहिल्या भेटीत बाबासाहेबांनी घोडेस्वारीचा आनंद लुटला होता. निपाणीत बाबासाहेबांचा घोड्यावर बसलेला पुतळा लवरकरच साकारणार आहे, हे उल्लेखनीय.

भीमराव रामजी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक. त्यांनी दलित चळवळ सुरू करून अस्पृश्यांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्याचे प्रयत्न केले. आपल्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली. डॉ. आंबेडकर प्रथम 11 एप्रिल 1925 रोजी निपाणीच्या सरकारी विश्रामधामात आले होते. त्यांनी दत्तोबा कराळे यांच्या घोड्यावर बसून सवारीचा आनंदही लुटला होता. त्यानंतर 30 ऑक्टोबर 1938 रोजी डॉ. आंबेडकरांनी निपाणी नगरपालिकेला भेट दिली होती. तत्कालीन नगराध्यक्ष देवचंद शाह यांनी त्यांचा नगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान केला होता.

बाबासाहेबांच्या सान्निध्यात आलेले डॉ. श्रीकांत वराळे यांच्या घरीही आंबेडकर आले होते. त्यांच्या स्मृतींचे स्मारक उभारण्यासाठी गव्हाणी येथील दहा एकर जागा शासनाने मंजूर केली आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. स्मारकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोड्यावर बसलेला पुतळा उभारण्यात येणार आहे. यंदा हा निर्धार पूर्णत्वास जाणार आहे.

प्रदर्शन भरवून भेटींबद्दल जागृती

बाबासाहेबांच्या एकूण सात भेटींच्या दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह आर्टिस्ट दीपक मधाळे व संतकुमार मधाळे बंधूंनी केला आहे. शिवाय गेल्या 33 वर्षांत त्यांनी शाळा-महाविद्यालयांत प्रदर्शन भरवून लोकांमध्ये या भेटींबद्दल जागृतीही केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news