Nipani Accident : दुचाकी अपघातात माजी सैनिक ठार

निपाणी-चिकोडी मार्गावर पट्टणकुडी हद्दीतील घटना
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

निपाणी : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात माजी सैनिक ठार झाले. विठ्ठल बाबुराव इंगळे (वय ४५, मूळगाव वाळकी, ता. चिकोडी सध्या रा. वाल्मिकी नगर, निपाणी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी रात्री झाला.

घटनेची नोंद खडकलाट पोलिसांत झाली आहे विठ्ठल इंगळे हे कामानिमित्त दुचाकीवरून वाळकी येथे गेले होते. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ते निपाणीकडे परतत होते. त्यांची दुचाकी निपाणी-चिकोडी मार्गावर पट्टणकुडी हद्दीत असलेल्या पेट्रोल पंपाव जवळ आली असता दुचाकी घसरून ते जोरात खाली कोसळले. त्यांना निपाणीतील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चिकोडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

उपचारादरम्‍यान शुक्रवारी दुपारी त्‍यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी खडकलाट पोलिस ठाणाच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर, सहाय्यक उपनिरीक्षक एस. सी. अंबरशेट्टी, हवालदार अरूण चौगुला यांनी पाहणी केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.