निपाणी : रस्त्याने चालत जात असताना दुचाकीने माागून धडक दिल्याने व्यवसायाने रिक्षाचालक असलेले मल्लिकार्जुन भीमाप्पा शिळण्णावर (वय ४२ रा.शिवाजीनगर सहावी गल्ली, निपाणी ) यांचा कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मल्लिकार्जुन शुक्रवारी निपाणीतील एका बँकेमध्ये गेले होते. बँकेतून परत येत असताना बेळगाव नाक्याजवळ भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली.त्यात ते गंभीर जखमी झाले.शहर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. तोपर्यंत त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचारांदरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला. मल्लिकार्जुन यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दुचाकीस्वा विरोधात शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी चालविला आहे.