Nipani Accident: निपाणीजवळ अपघातात सिंधुदुर्गचा युवक ठार

निपाणी-मुरगूड मार्गावर जवाहरलाल तलाव मार्ग वळणाजवळ स्पीड ब्रेकरवरून दुचाकी उडाल्याने रस्त्यावर आपटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्गचा युवक ठार झाला
Nipani Accident
Nipani Accident: निपाणीजवळ अपघातात सिंधुदुर्गचा युवक ठार Pudhari
Published on
Updated on

निपाणी : निपाणी-मुरगूड मार्गावर जवाहरलाल तलाव मार्ग वळणाजवळ स्पीड ब्रेकरवरून दुचाकी उडाल्याने रस्त्यावर आपटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्गचा युवक ठार झाला. संकेत दिलीप चव्हाण (वय 38, रा. तुळशीकाठे, जामसंडे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली आहे.

संकेत हा जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. तो आपल्या कुटुंबीयांसमवेत हमीदवाडा (ता.कागल) येथे नातेवाईकांकडे वार्षिक यात्रेसाठी गेला होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास तो हमीदवाडा येथून नातेवाईकांची दुचाकी घेऊन निपाणीस येत होता. मात्र, वळणावर असलेला स्पीडब्रेकर न दिसल्याने संकेतचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्यावर आपटला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच घटनास्थळी सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार प्रभू सिद्धाठगीमठ यांनी भेट देऊन ओळख पटवली. पुढील तपास उपनिरीक्षक कार्जोळ करत आहेत. संकेतच्या पश्चात आई, वडील, भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news