

बेळगाव : यंदाच्या शैक्षणिक वर्षाला 29 मेपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. 2024-25 या शैक्षणिक वर्षाची सांगता 10 एप्रिल रोजी होणार आहे.
10 एप्रिलपासून उन्हाळी सुटीला प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वीच शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 244 दिवसांचे शैक्षणिक वर्ष असणार आहे. यात 180 दिवस अभ्यासक्रमाचे आहेत. 26 दिवस चाचणी परीक्षा आणि इतर परीक्षांसाठी ठेवले आहेत. 10 दिवस विशेष कार्यक्रमासाठी व चार दिवस स्थानिक सुटीसाठी राखीव ठेवले आहेत. सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे लागणार आहे. तसेच सुटीतच पाठ्यपुस्तके वितरणाचे नियोजन करावे लागणार आहे.