Mysore Ajmer Express: म्हैसूर-अजमेर एक्सप्रेस आता साप्ताहिक

उद्यापासून प्रारंभ : म्हैसूरहून दर शनिवारी तर अजमेरहून सोमवारी धावणार
Mysore Ajmer Express: म्हैसूर-अजमेर एक्सप्रेस आता साप्ताहिक
Published on
Updated on

बेळगाव : रेल्वे मंत्रालयाने म्हैसूर-अजमेर-म्हैसूर स्पेशल एक्सप्रेसचे नियमित साप्ताहिक एक्सप्रेसमध्ये रुपांतर करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार म्हैसूर-अजमेर-म्हैसूर (क्र. १६२८१/१६२८२) गाडी यापुढे साप्ताहिक एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. ही सेवा शनिवारपासून (दि. ५) सुरु होणार आहे.

म्हैसूर-अजमेर साप्ताहिक एक्सप्रेस (क्र. १६२८१) दर शनिवारी म्हैसूरहून सकाळी आठ वाजता सुटून सोमवारी पहाटे ४.३५ वाजता अजमेरला पोचेल. या गाडीला बेळगाव स्थानकावर रात्री ११.०५ ते ११.१० या वेळेत थांबा असेल. याशिवाय धारवाड, हुबळी, लोंढा, घटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, चित्तोडगड आदी प्रमुख स्थानकांवर थांबे असतील.

परतीच्या प्रवासात अजमेर-म्हैसूर साप्ताहिक एक्स्प्रेस (क्र. १६२८२) दर सोमवारी सायंकाळी ६.५० वाजता अजमेरहून सुटेल आणि बुधवारी सायंकाळी ७ वाजता म्हैसूरला पोचेल. या गाडीला बेळगावात बुधवारी पहाटे ३.४५ ते ३.५० या वेळेत थांबा असेल. ही सेवा ७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या साप्ताहिक एक्सप्रेसला एकूण १८ डबे असतील. त्यामध्ये एक एसी फर्स्ट क्लास, दोन एसी टू-टियर, दोन एसी थ्री-टियर, सात स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन लगेज-कम-ब्रेकव्हॅन/दिव्यांगजन डबे असतील. या निर्णयामुळे म्हैसूर, बेळगावसह कर्नाटकातील विविध शहरांना राजस्थानातील अजमेरशी नियमित रेल्वेसेवा उपलब्ध होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news