

निपाणी : शहरात मुस्लिम समाजाची अनेक कामे प्रलंबित आहेत. शहरातील अंजुमन हॉल, ईदगाह व कब्रस्तानचे काम प्रलंबित असून सर्व कामे मार्गी लावावीत, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजातील युवकांच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यात आले.
भूलवाद मंडळ सदस्य अब्बास फरास यांच्या नेतृत्वाखाली गोकाक येथे पालकमंत्र्यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. पालकमंत्र्यांनी शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेतल्यावर सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, चिकोडी जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी जावेद काझी, निपाणी शहर अल्पसंख्याक अध्यक्ष सैफुल पटेल, उपाध्यक्ष टिपूसुलतान ननदी, इम्रान बडेघर यांच्यासह युवक उपस्थित होते.