Kalloli Murder Case | स्टेटस ठेवला अन् जीवाला मुकला; कल्लोळी खूनप्रकरणी दाम्पत्याला अटक

अनैतिक संबंधाचा संशय
Kalloli Murder Case |
Kalloli Murder Case | स्टेटस ठेवला अन् जीवाला मुकला; कल्लोळी खूनप्रकरणी दाम्पत्याला अटक
Published on
Updated on

बेळगाव : आपल्या पत्नीसोबतचा स्टेटस पाहून त्याचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून कल्लोळीत (ता. मुडलगी) येथे दोन दिवसांपूर्वी खुनाची घटना घडली होती. याप्रकरणी घटप्रभा पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली.

लक्ष्मी बनाप्पा वडेयर (वय ३३) व बनाप्पा रामचंद्र वडेयर (वय ४७, दोघे रा. कल्लोळी, ता. मुडलगी) अशी संशयितांची नावे आहेत. तर रमेश हनुमंत बंड्रोळी (वय ३८, रा. गुंजानट्टी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी : मृत हनुमंतने काही दिवसांपूर्वी आपला व लक्ष्मीचा एकत्रित असलेला फोटो स्टेटसला ठेवला होता. तेव्हापासून बनाप्पाला रमेशचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून काटा काढण्याच्या उद्देशाने त्याने रमेशला आपल्या घराकडे बोलावून घेतले. घराच्या मागे नेऊन त्याने विळ्याने वार करून रमेशचा खून केला. घटप्रभा पोलिसांत या घटनेची नोंद झाली होती. निरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी या प्रकरणाचा तपास करत पती-पत्नीला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news