Mumbai Bengaluru special train: मुंबई-बंगळूर विशेष रेल्वे 19 पासून जुलैपर्यंत 13 फेऱ्या होणार

एप्रिल ते जुलै या काळात त्यांच्या 13 फेऱ्या होणार आहेत. या रेल्वेसेवेमुळे बेळगावच्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे
train
trainfile photo
Published on
Updated on

बेळगाव : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बंगळूरमधील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस या मार्गावर दोन साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. एप्रिल ते जुलै या काळात त्यांच्या 13 फेऱ्या होणार आहेत. या रेल्वेसेवेमुळे बेळगावच्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

साप्ताहिक विशेष एक्सप्रेस (क्र. 01013) 19 एप्रिल ते 12 जुलै या कालावधीत दर रविवारी 11.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटेल व सोमवारी 11.45 वाजता सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनसवर पोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे (क्र. 01014) 20 एप्रिल ते 13 जुलै 2026 या कालावधीत दर सोमवारी 13.50 वाजता बंगळूरमधून सुटेल व मंगळवारी 13.30 वाजता मुंबईला पोचेल.

या प्रवासात ही रेल्वे ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, रायबाग, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, हरिहर, दावणगेरी, चिकजाजूर, बिरुर, अर्सिकेरे आणि तुमकूर या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेला एकूण 22 बोगी असतील. त्यात वातानुकूलित, स्लीपर व सामान्य बोगींचा समावेश असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news