Education success story: पढने की कोई उम्र नही होती...!

आई अन्‌‍ मुलगी एकाच वेळी बारावी उत्तीर्ण!
Education success story: पढने की कोई उम्र नही होती...!
Published on
Updated on

बेळगाव : पढने लिखने की कोई उम्र नही होती, जब चाहे शुरू हो जाए... अशा आशयाची जाहिरात सरकार साक्षरता वाढवण्यासाठी करत होते. त्याची प्रत्यक्ष प्रचिती यंदा बारावीच्या निकालात आली आहे. ब़ेळगाव जिल्ह्यातच एक आई आणि तिची मुलगी अशा दोघी एकाच वेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत!

शिल्पा गिरेण्णावर आणि तिची मुलगी पल्लवी गिरेण्णावर अशी या दोघींची नावे आहेत. त्या मुडलगी तालुक्यातील कल्लोळी गावच्या रहिवाशी आहेत. शिल्पा अंगणवाडी सेविका आहे. वड्डेरट्टी सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये बाह्य प्रवेश घऊन कला शाखेत त्यांनी 54 टक्के गुण मिळविले आहेत. तर मुलगी पल्लवीने नागनूर येथील अथर्व पदवीपूर्व कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून 78 टक्के गुण मिळवले आहेत.

निकालाबाबत शिल्पा म्हणाल्या, मी आता 37 वर्षाची आहे. 2005 मध्ये दहावी पास झाले होते. मात्र त्याच वर्षी लग्न झाले. त्यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. त्यानंतर 2009 मध्ये अंगणवाडी शिक्षिका म्हणून मी रूजू झालेे. सरकारने अलिकडे शिक्षण धोरणात बदल सुरू केला आहे. अंगणवाडी केंद्र हायटेक केले जात आहेत. एलकेजी, युकेजी वर्गही जोडले जाणार आहेत. त्यामुळे पुढचे शिक्षण घ्यावेसे वाटले. त्यासाठी बारावीला बहिस्थः विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात बारावी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. माझ्या मुलींनी मला अभ्यास करण्यासाठी सहकार्य केले. पुढे पदवीही पूर्ण करणार आहे, असेही शिल्पा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news