Belgaum Missing Case: मारीहाळ येथून मायलेकी बेपत्ता

बेळगाव तालुक्यातील मारीहाळ येथून मायलेकी बेपत्ता झाल्याची नोंद मारीहाळ पोलिसांत झाली
Belgaum Missing Case: मारीहाळ येथून मायलेकी बेपत्ता
Published on
Updated on

बेळगाव : तालुक्यातील मारीहाळ येथून मायलेकी बेपत्ता झाल्याची नोंद मारीहाळ पोलिसांत झाली आहे. पूजा संदीप पाटील (वय ३१) व तिची मुलगी सुकन्या (वय ११, दोघेही रा. मारीहाळ) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.

सदर महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३० जून रोजी पूजा ही तिच्या अकरा वर्षाच्या मुलीसह घरात काहीही न सांगता निघून गेली आहे. सदर महिलेची उंची ५ फूट, गोल चेहरा, सरळ नाक, गव्हाळ रंग, काळे केस व अंगाने सडपातळ आहे. तिला कन्नड, मराठी, हिंदी भाषा अवगत आहे. जाताना तिने चॉकलेट रंगाची साडी नेसली आहे.

मुलीची उंची ४ फूट, गोल चेहरा, सरळ नाक, गव्हाळ रंग व अंगाने सडपातळ आहे. तिच्या अंगावर निळा-पांढरा फ्रॉक आहे. तिला मराठी भाषा बोलता येते. या मायलेकीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी मारीहाळ पोलिसांशी संपर्क (०८३१-२४०५२३९ अथवा ९४८०८०४१११) साधावा, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news