Mobile Theft | दीड लाखाच्या मोबाईलवर डल्ला

भिक्षुकाच्या वेशातील चोरट्याचे कृत्य; चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
बेळगाव : सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला चोरटा.
बेळगाव : सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला चोरटा.
Published on
Updated on

बेळगाव : भिक्षुकाचा वेश धारण करून आलेल्या चोरट्याने दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल लंपास केल्याची घटना गोवावेसजवळील एका मोबाईल शोरुममध्ये सोमवारी (दि. १३) उघडकीस आली आहे. काही क्षणांत अत्यंत सफाईदारपणे चोरी करून संशयित पसार झाला. मात्र, त्याची संपूर्ण हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, भिक्षुकाच्या वेशात आलेल्या व्यक्तीने ग्राहक असल्याचा आव आणत दुकानात प्रवेश केला. विविध मोबाईल पाहण्याच्या बहाण्याने तो विक्री काउंटरजवळ बराच वेळ घुटमळत राहिला. कर्मचाऱ्यांचे लक्ष दुसरीकडे वळल्याची संधी साधत त्याने प्रदर्शनासाठी ठेवलेला सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मोबाईल अलगद आपल्या खिशात टाकला. त्यानंतर बिलिंग काउंटरकडे जात असल्याचे भासवत तो शांतपणे दुकानाबाहेर पडला. काही वेळाने मोबाईल जागेवर नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये संशयिताची चोरीची संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसून आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news