India Srilanka Joint Military Drill | ‘मित्र शक्ती’ला बेळगावात प्रारंभ

भारत-श्रीलंका संयुक्त लष्करी सराव : 305 सैनिकांचा सहभाग, 23 पर्यंत चालणार
India Srilanka Joint Military Drill
बेळगाव : लष्करी सरावात सहभागी भारत व श्रीलंका लष्कराचे अधिकारी व जवान. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

बेळगाव : भारत व श्रीलंका लष्कराच्या ‘मित्र शक्ती-2025’ या संयुक्त सरावाला सोमवारपासून (दि. 10) बेळगावात प्रारंभ झाला. हा सराव 23 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. दोन्ही देशांच्या एकूण 305 सैनिकांनी या सरावात भाग घेतला आहे.

भारताकडून राजपूत रेजिमेंटच्या 170 जवानांनी सहभाग घेतला आहे. तर श्रीलंकन लष्कराच्या तुकडीमधून गजाबा रेजिमेंटचे 135 जवान सहभागी झाले आहेत. याशिवाय भारतीय वायुसेनेचे 20 आणि श्रीलंकन वायुसेनेचे 10 अधिकारीही सरावात सहभागी झाले आहेत. या सरावाचा मुख्य उद्देश दहशतवादविरोधी संयुक्त कारवाईची तयारी, दोन्ही देशांतील संबंध सुधारणे हा आहे. सरावात युद्धकौशल्याचे प्रात्यक्षिक सादरीकरण, आर्मी मार्शल आर्ट्स, शुटिंग आणि योग यांचाही समावेश सरावात करण्यात आला आहे. या सरावात ड्रोन, काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टिम्स आणि हेलिकॉप्टरच्या वापरावरही भर दिला जाणार आहे. तसेच हेलिपॅड सुरक्षा, कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन (जखमी जवानांची सुरक्षित सुटका) यांसारख्या कृतींचा संयुक्त सराव दोन्ही देशांच्या सैन्यांकडून केला जाईल.

India Srilanka Joint Military Drill
Belgaum news : कसनाळ-जंगमवाडी रस्त्याची दुर्दशा

या सरावाद्वारे भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर समन्वय, तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण, आणि संयुक्त मोहिमांदरम्यान जीवितहानी कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. दोन्ही देशांमधील लष्करी संबंध अधिक दृढ होण्यास आणि प्रादेशिक शांतता टिकवण्यासाठी ‘मित्र शक्ती-2025’ हा सराव महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news