Satish Jarkiholi : मंत्र्यांना स्टिंग ऑपरेशनमध्‍ये अडकविण्‍याचा प्रयत्‍न

मंत्री सतीश जारकीहोळी यांचा दुजोरा : सर्वांना सतर्क राहण्‍याचे आवाहन
Satish Jarkiholi
Satish Jarkiholi
Published on: 
Updated on: 

बंगळूर : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना स्टिंग ऑपरेशनच्या जाळ्यात अडकविण्याचा कट रचण्यात आल्याच्या आरोपाला सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी दुजोरा दिला आहे. ते शुक्रवार, दि. ९ रोजी पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकरणाची माहिती उघड करून सर्वांना सावध केले आहे. उत्तर भारतातून आलेल्या काही लोकांनी डी. के. शिवकुमार यांना स्टिंग ऑपरेशनमध्‍ये अडकविण्‍याचा प्रयत्न केला होता. माझ्याविरोधात असा प्रयत्न झाला असल्याने तुम्ही सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असा इशारा मुख्‍यमंत्री शिवकुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना दिल्याचे त्‍यांनी सांगितले.

एखाद्याला जाळ्यात अडकविण्यासाठी येणारे लोक विविध प्रकारची प्रलोभने दाखवतात. अशा मोहाला बळी पडल्यास अनेकजण सहजपणे जाळ्यात अडकतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता सर्वांनी सावध राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. राजकारणात अशा घटना सामान्य असून, आपण सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असेही मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.

एका केंद्रीय मंत्र्याने कट रचला : आ. गणिग रविकुमार

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना स्टिंग ऑपरेशनच्या जाळ्यात अडकविण्यासाठी एका केंद्रीय मंत्र्याने व राज्यातील भाजपच्या एका नेत्याने एकत्र येऊन कट रचल्याचा आरोप आमदार गणिग रविकुमार यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भातील सर्व कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे सांगत ती लवकरच जाहीर करणार असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी एक पेनड्राईव्हही दाखविला आहे. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.

आमदार रविकुमार यांनी मुख्यमंत्र्यासह काही मंत्र्यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी दिल्लीस्थित एका एजन्सीला सुपारी देण्यात आली आहे. या एजन्सीच्या प्रतिनिधींना बंगळूरमधील एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एका केंद्रीय मंत्र्याने व राज्यातील भाजपच्या एका नेत्याने एकत्र येऊन स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी सुपारी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्र्यांचे स्टिंग ऑपरेशन करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याची त्यांची योजना होती. मात्र आमचे मंत्री निष्कलंक असून, ते या जाळ्यात अडकले नाहीत. स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी सुपारी दिल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. योग्यवेळी ते जाहीर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news