बंगळूर : सोशल नेटवर्किंग साईट गुगल चालवणारी कंपनी मेटाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माफी मागितली आहे. कर्नाटकातील शहरांची नावे कन्नडमध्ये चुकीच्या पद्धतीने लिहिणार्या गुगलने मुख्यमंत्र्यांच्या इंग्रजी विधानाचे कन्नडमध्ये चुकीचे भाषांतर केले. यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला.
यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मेटाला पत्र लिहिले होते. त्यांनी म्हटले होते की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने अधिकृत संवाद हाताळताना जबाबदारीने वागले पाहिजे. सोशल मीडियावर वारंवार प्रसारित होणार्या भाषांतरातील चुकांबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील स्वयंचलित कन्नड भाषांतरात आढळलेल्या त्रुटींबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला उत्तर देताना मेटाने त्रुटीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे म्हटले आहे. गेल्या काही काळापासून चुकीचे कन्नड भाषांतर होत असलेल्या समस्येचे आम्ही निराकरण केले आहे. आम्ही याबद्दल माफी मागतो, असे उत्तर मेटाने मुख्यमंत्र्यांच्या पत्राला दिले आहे.