Abroad Education Scam
Abroad Education Scam| विदेशात एमबीबीएस : 75 लाखांचा गंडाFile Photo

Abroad Education Scam| विदेशात एमबीबीएस : 75 लाखांचा गंडा

यमनापूर येथील डॉक्टर विरोधात गुन्हा; 37 जणांकडून रक्कम उकळली
Published on

बेळगाव : आपण रशिया येथे एमबीबीएस पूर्ण करून आलो असून तेथील कॉलेजमध्ये आपली ओळख आहे. तिकडे एमबीबीएस कोर्ससाठी तुम्हाला प्रवेश मिळवून देतो व चांगली नोकरी लावतो असे सांगून तब्बल 37 जणांकडून डॉक्टरने 74 लाख रुपये लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सूरज अशोक अनगोळकर (राहणार हरिप्रिया कुंज मारुती गल्ली, यमनापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. हा डॉक्टर यमनापूर येथील असून त्याचे हॉस्पिटल येथील खडेबाजारमध्ये आहे त्यामुळे त्याच्या विरोधात खडे बाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अझरुद्दीन अब्दुल समद रंगारी (वय 32, राहणार न्यू गांधीनगर) यांनी दिलेली फिर्याद व खडे बाजार पोलिसांत दिलेली माहिती अशी की, नोव्हेंबर 2024 मध्ये फिर्याददार अझरुद्दीन यांना संशयित सूरज हा भेटला होता. यावेळी त्यांनी फिर्यादीला आपले खडेबाजार येथील राजेंद्र कॉम्प्लेक्समध्ये स्नेहा क्लिनिक नावाचे हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल मी व माझी पत्नी स्नेहा दोघेजण चालवतो. आपण रशिया येथून एमबीबीएस पूर्ण केलेले असून तेथील कॉलेजमध्ये आपली चांगली ओळख आहे.

आपल्या देशातील तिकडे कोणी जाणार असल्यास त्यांना तेथे चांगली नोकरी लावून पगारही चांगला देण्याची व्यवस्था करतो. शिवाय एमबीबीएसला प्रवेश ही मिळवून देतो. नोकरीसाठी तेथे रशियन रुबेल्स मध्ये 90000, तर भारतीय चलनात एक लाख चार हजार पगार देण्याची व्यवस्था व एक वेळचे जेवण मिळण्याची व्यवस्था करतो, असे सांगून फिर्यादीकडून व त्यांचे काही मित्र तसेच अन्य लोक अशा 37 जणांकडून 13 लाख 50 हजार रुपये फोन पे च्या माध्यमातून उकळले.

याशिवाय खडेबाजार येथील स्नेहा क्लिनिकमध्ये रोख स्वरूपात टप्प्याटप्प्याने तब्बल 60 लाख 50 हजार रुपये घेतले अशी एकूण 74 हजार रुपयांची रक्कम त्याने उकळली. यानंतर त्याने रशियाचा वर्क व्हिसा देतो असे सांगून 22 जणांना व्हिजिट व्हिसाद्वारे रशियाला पाठवले. ते फक्त भेटीसाठी आले असल्याचे सांगत रशियातून त्यांना पंधरा दिवसांनी पुन्हा भारतात पाठवाले. त्यामुळे संबंधित डॉक्टरने आपल्याकडून रक्कम घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद संबंधितांनी पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी याची नोंद करून घेतली असून निरीक्षक महांतेश धामणवर पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news