Belgaum missing woman: दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

रामापूर येथील २६ वर्षीय महिला दोन लहान मुलांसह बेपत्ता झाली आहे
missing
missingPudhari
Published on
Updated on

बेळगाव : तालुक्यातील रामापूर येथील २६ वर्षीय महिला दोन लहान मुलांसह बेपत्ता झाली आहे. मारिहाळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्रावती बसवराज कट्टावी (वय २६) आपली दोन मुले समर्थ (वय ६) व साई (वय २), (सर्व रा. रामापूर, ता. बेळगाव) यांच्यासह बुधवार १३ मे रोजी रात्री सुमारे ११च्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. नेत्रावती हिचा चेहरा गोल असून नाक लांब, केस काळे आहेत. त्या शरीराने सुदृढ असून घरातून बाहेर पडताना तिने हिरव्या रंगाचा टॉप, काळी पँट परिधान केली आहे. ती कन्नड भाषा बोलते बोलते.

समर्थचा चेहरा गोल, नाक लांब आहे. घरातून जाताना त्याने लाल रंगाचा शर्ट व निळी जीन्स घातली आहे. तोही कन्नड भाषा बोलतो. साई दोन वर्षांचा असून त्याचा चेहरा गोल, नाक मोठे आहे. त्याने पांढरा शर्ट व काळी शॉर्ट्स घातली आहे. तिघांबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलिस स्थानकाशी किंवा मारिहाळ पोलिस स्थानक क्रमांक ०८३१-२४०५२३९ या फोन क्रमांकवर किंवा ९४८०८०४१११ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news