Markandeya Sugar Factory : मार्कंडेय साखर कारखाना लीजवर देणार?

आज सर्वसाधारण सभेत निर्णय : यंदा तरी गाळप सुरू होण्याची शेतकऱ्यांना आशा
Markandeya Sugar Factory
Markandeya Sugar Factory
Published on
Updated on

बेळगाव : बेळगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे स्वप्न असलेला काकतीतील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना लीजवर देण्याची तयारी करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे गाळपच झालेले नसल्याने यंदापासून तरी पुन्हा गाळप सुरू होण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. गुरुवारी कारखान्याची सर्वसाधारण सभा होणार असून, त्यात हा निर्णय होणार आहे.

कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता कारखानास्थळावर होणार आहे. मार्कंडेय कारखान्यावर कर्ज वाढल्यामुळे संचालक मंडळाला दोन वर्षांपासून कारखाना बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे कारखाना खासगी कंपनीला लीजवर देऊन सुरू करण्याचे प्रयत्न संचालकांनी सुरू केले आहेत. लीजसाठी एक कंपनी उत्सुक असल्याचेही समजते. त्यांनी प्राथमिक चर्चाही केलेली आहे.

गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत कारखाना लीजवर देण्याविषयी चर्चा होईल. लीजसह सभेत एकूण १३ विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये न्यायालयीन प्रकरणे, कर्मचारी नियुक्ती, वेतन थकबाकी आदींचा विषय आहे. सभा कारखान्याचे उपाध्यक्ष बसवंत मायाण्णाचे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे.

शिवाय हुदलीतील सतीश शुगर्स सोडल्यास तालुक्यातील हा एकच साखर कारखाना आहे. कारखान्यामुळे तालुक्यातील ऊसलागवड क्षेत्र वाढण्याची आशा आहे. २०२०-२१ मध्ये पहिला गाळप हंगाम यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र गेली दोन वर्षे कारखाना बंद आहे. परिणामी लीजवर देऊन तरी परिसरातील उसाचे गाळप करण्याचे प्रयत्न संचालक मंडळाने चालवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news