Belgaum Crime : कर्जाच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

ऐनापूरच्या संशयितावर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

बेळगाव : कर्ज मिळवून देतो म्हणून कमिशन घेत कर्जाची मुद्दलही हडप करणाऱ्या एकावर शहापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुनील सातप्पा वंजोळे (रा. महावीर चौक, ऐनापूर, ता. अथणी) असे संशयिताचे नाव आहे. गजानन विठ्ठल बागाई (रा. लोळसूर, ता. गोकाक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर बुधवारी गुन्हा दाखल झाला.

याबाबत माहिती अशी की, उपरोक्त संशयित तवम टेक्नालॉजीस प्रा. लि., या फायनान्स कंपनीत जनसंपर्क अधिकारी तथा व्यवस्थापक म्हणून काम करतो. या कंपनीचे कार्यालय शहापूर परिसरात आहे. सन २०२३ ते २०२५ या दोन वर्षांच्या काळात त्याने लोकांना फायनान्स कंपनीत कर्ज मिळवून देतो, असे सांगत कंपनीच्या नावावर कमिशनच्या रूपात बरीच रक्कम हडपली. यानंतर अनेकांनी कर्ज घेतल्यानंतर ती रक्कम भरण्यासाठीही सुनील वंजोळे याने ही रक्कम कंपनीत न भरता ती देखील हडप केली. असे करून त्याने अनेकांची सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद गजानन बागाई यांनी शहापूर पोलिसांत दिली आहे. त्यानुसार येथील सहायक उपनिरीक्षक के. के. बागेवाडी यांनी याची नोंद करून घेतली आहे. पोलिस निरीक्षक एस. एस. सीमानी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news