बेळगाव : गर्लफ्रेंडशी बोलला म्हणून सात जणांचा हल्ला

गर्लफ्रेंडशी बोलला म्हणून सात जणांचा हल्ला
Belgaum News
गर्लफ्रेंडशी बोलला म्हणून सात जणांचा हल्ला; अनगोळ नाक्याजवळ घटना file photo

बेळगाव : आपल्या गर्लफ्रेंडशी का बोलतोस, असे म्हणत अर्वाच्च शिवीगाळ करत मित्र असलेल्या तरुणावर खुनी हल्ला झाला. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टिळकवाडीतील अनगोळ नाका येथे ही घटना घडली. याप्रकरणी सात जणांविरोधात खुनी हल्ल्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शाहीद इब्राहिम लष्करवाले (वय 33, रा. झटपट कॉलनी, अनगोळ) असे जखमीचे नाव आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये श्रवण संतोष शिरवेकर, श्याम, अमोघ ऊर्फ बटूक व अन्य चौघांचा समावेश आहे.

याबाबत टिळकवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहीद व श्रवण हे दोघेजण मित्र आहेत. श्रवणची गर्लफ्रेंड लक्ष्मी ही चार महिन्यांपूर्वी शाहीद याचा नंबर घेऊन काम असेल तेव्हा तसेच भेटल्यानंतर बोलत होती. याचा राग श्रवणला होता.

२६ जून रोजी रात्री ९.३० च्या सुमारास शाहीद हा अनोगळ नाका येथे कामानिमित्त गेला होता. यावेळी श्रवण व त्याच्यासमवेत असलेले अन्य सहकारी श्याम, अमोघ व अन्य चौघेजण त्याला अचानक भेटले. तुझाशी बोलायचे आहे चल असे म्हणत त्याला रात्री दहाच्या सुमारास टिळकवाडी नाक्याजवळील मुत्तू चिकन सेंटरसमोर सार्वजनिक रस्त्यावर नेले. तेथे नेऊन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अर्वाच्च शिवीगाळ सुरू केली.

माझ्या गर्लफ्रेंडशी तू का बोलतोस, असे म्हणत त्याच्या पायावर लोखंडी रॉडने हल्ला केला. इतरांनीही दगडाने हल्ला करून शाहीदला गंभीर जखमी केले. पुन्हा जर तिच्याशी बोललास तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्याला दिली. जखमी झालेल्या शाहीदने मध्यरात्री पाऊणच्या सुमारास टिळकवाडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार सर्वांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news