महिलेचे फोटो काढून ब्लॅकमेल करणार्‍याला अटक

कवठेमहांकाळ पोलिसांची मदभावीत कारवाई
महिलेचे फोटो काढून ब्लॅकमेल करणार्‍याला अटक
File Photo
Published on
Updated on

अथणी : महिलेचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करतो म्हणून ब्लॅकमेल करणार्‍याला कवठेमहांकाळ पोलिसांनी मदभावी येथून अटक केली.

मारुती रामचंद्र जाधव (वय 36, रा. मदभावी, ता. अथणी) असे संशयिताचे नाव आहे. त्याने कवठेमंकाळ तालुक्यातील एका महिलेचे खासगी फोटो चोरून काढून व्हायरल करतो म्हणून दहा लाखांची मागणी केली होती. याप्रकरणी तपास करून? ? कवठेमंकाळ पोलिसांनी त्याला अटक केली.

याबाबत समजलेली माहिती अशी, पीडित महिला कवठेमहांकाळ तालुक्यातील असून ती रेल्वे खात्यामध्ये कामाला आहे. संशयित जाधवने सदर महिलेचे खासगी फोटो आणि व्हिडीओ काढले होते. त्यानंतर त्याने सदर महिलेला ब्लॅकमेल करून दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर मिरजला येऊन भेट अशी धमकी त्याने सदर महिलेला दिली होती. त्यामुळे सदर महिलेने घाबरून कवठेमंकाळ पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली. कवठेमहांकाळ पोलिसांनी याचा तपास करून मदभावी येथे येऊन त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय कोळेकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news