Belgaum Lokayukta raid: पावणेचार नव्हे, चौदा कोटी

लोकायुक्त छापा : नगरविकास अधिकाऱ्याकडे सापडलेले घबाड वाढले
Belgaum Lokayukta raid
Belgaum Lokayukta raidPudhari
Published on
Updated on

बेळगाव : लोकायुक्त विभागाने तीन दिवसांपूर्वी जिल्हा नगरविकास कक्षाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अजयसिंग बापूसिंग रजपूत यांच्यावर छापा टाकला होता. त्यावेळी प्राथमिक तपासात पावणेचार कोटींची बेकायदेशीर मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते. परंतु, आता लोकायुक्त खात्याने अंतिम यादी जाहीर केली असून ही मालमत्ता 14 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

लोकायुक्त पोलिस अधिकाऱ्यांनी 7 एप्रिल रोजी रजपूत यांच्या पाच ठिकाणच्या मालमत्तेवर एकाचवेळी छापा टाकला होता. त्यात अंजनेयनगरमध्ये एकाला लागून एक असलेली तीन घरे, अथणी व हुक्केरी येथील दोन घरांचा समावेश होता. तेव्हा त्यांच्याकडे स्थावर व जंगम अशी 3 कोटी 78 लाख 92 हजार 250 रुपयांची उत्पन्न स्त्रोतापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे लोकायुक्त विभागाने सांगितले. परंतु, यामध्ये आता साडेतीन पटीने वाढ झाली असून ती 14 कोटी असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

अंतिम मोजणीमध्ये पावणेचार कोटींची मालमत्ता 14 कोटींची झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बेळगावातील तीन घरे, सौंदत्ती, हुक्केरी व हुबळीतील पाच घरे, 5 किलो 960 ग्रॅम सोने व हिऱ्याचे दागिने, पाच किलो चांदीचे दागिने व अन्य वस्तू, 3 कोटी 12 लाखांच्या मुदतठेवी, एक कार व एक दुचाकीचा समावेश आहे. या सर्व मालमत्तेचे मूल्य 14 कोटीहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news