Karnataka Lokayukta Raid: इंडी उपनोंदणी कार्यालयावर लोकायुक्तांचा छापा

५० हजार रुपयांहून अधिक रक्कम जप्त; पाचजण ताब्यात
 Raid
Raid Pudhari
Published on
Updated on

विजापूर : लोकायुक्तांच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाने विजापूर जिल्ह्यातील इंडी येथील उपनोंदणी (सब-रजिस्ट्रार) व विवाह नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर अचानक छापा टाकून ५० हजार रुपयांहून अधिक संशयास्पद रक्कम जप्त केली. तसेच कार्यालयाशी थेट संबंध नसलेल्या पाचजणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

छाप्यावेळी कार्यालयात ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून, कार्यालयात बाँड रायटर आणि एजंट म्हणून काम करणाऱ्या काही खासगी व्यक्तीही आढळून आल्या. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कार्यालयातील महत्त्वाच्या फाईली तसेच एजंटांच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी केली.

लोकायुक्‍त पोलिस अधीक्षक टी. मल्लेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात डीवायएसपी मल्लिकार्जुन तुळसीगेरी, सीपीआय आनंद ठक्कण्णनवर, आनंद डोणी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीबाबत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. सध्या कार्यालयात तपास सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक टी. मल्लेशी यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news