Lakshmi Hebbalkar: आश्वासनांपासून मागे हटणार नाही

मंत्री हेब्बाळकर : सुळगेत महालक्ष्मी मंदिराचे लोकार्पण
Lakshmi Hebbalkar
Lakshmi Hebbalkar: आश्वासनांपासून मागे हटणार नाहीPudhari
Published on
Updated on

बेळगाव : मी दिलेल्या आश्वासनांपासून कधीही मागे हटणार नाही. निवडणुकीपूर्वी असो वा निवडणुकीनंतर मी लोकांना दिलेली सर्व आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहे. संपूर्ण मतदारसंघाचा विकास होत असताना लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञता दिसून येत आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

सुळगेत (हिं.) उभारण्यात आलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण कार्यक्रमात मंत्री हेब्बाळकर शनिवारी (दि. 7) सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी मंदिर लोकार्पण केल्यानंतर त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, गेल्या सात वर्षांत मतदारसंघात 150 हून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. याशिवाय, मूलभूत सुविधांच्या विकासासह सर्व प्रकारची कामे केली जात आहेत. यात्रांसाठी प्रत्येक गावाला 3 ते 5 कोटी रुपये दिले जात आहेत. मतदारसंघातील कामांना मी कधीही नाही म्हटलेले नाही. त्यामुळे, केवळ निवडणुकांच्या काळात येणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले.

त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, बाळू देसुरकर, भागाण्णा नरोटी, संजय पाटील, रमेश खन्नुकर, पंचायत विकास अधिकारी वीणा हलवाई, जयवंत बाळेकुंद्री, मारुती पाटील, मल्लाप्पा सुलगेकर, काशीराम पाटील, अजित कलखांबकर, पप्पू पाटील, यल्लप्पा कलखांबकर, मनोज कलखांबकर, शेखर पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news