Accident News: कुंभार्डाजवळ ओमनीने दोघांना उडवले

महिला, वृद्ध जागीच ठार : रामनगर-धारवाड मार्गावर पादचार्‍यांचा जीव कवडीमोल
Accident News |
Accident News: कुंभार्डाजवळ ओमनीने दोघांना उडवलेPudhari Photo
Published on
Updated on

खानापूर : दोघा पादचार्‍यांना मागून आलेल्या भरधाव ओमनीने ठोकरल्याने महिला व वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना रामनगर-धारवाड मार्गावर कुंभार्डा (ता. खानापूर) गावाजवळ घडली. सीमा अमर हळणकर (वय 26) व रवळू भरमाणी चौधरी (65, दोघेही रा. कुंभार्डा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास कुंभार्डा गावापासून एक कि.मी. अंतरावर हा अपघात घडला.

सीमा मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. तर रवळू हे आपल्या शेताकडे जात होते. गावापासून धारवाडच्या दिशेने काही अंतरावर चालत जात असताना त्याना मागून आलेल्या ओमनी वाहनाने जोराची धडक दिली. दोघेही रस्त्याच्या कडेला उडून पडले. सीमा यांच्या तोंडाला व हाताला तसेच रवळू यांच्या कान, कपाळ आणि पायाला गंभीर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी खानापूर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला होता. रामनगरजवळील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या साहाय्याने फरार वाहनाचा शोध घेण्यात आला.

पादचार्‍यांना ठोकरलेले वाहन ओमनी असल्याचे दिसून आले. ओमनीचा चालक इरफान अब्दुलसत्तार मुल्ला (रा. फोंडा, गोवा) याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी खानापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर-धारवाड मार्गावर मॉर्निंग वॉकला जाणार्‍यांची संख्या अधिक आहे. यापूर्वीही भरधाव वाहनाच्या धडकेत वेगवेगळ्या अपघातांत चारजणांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्याच्या बाजूला बाजूपट्टीचा अभाव असल्याने रस्ता सोडून खाली गेलेल्या वाहनांच्या धडकेत पादचार्‍यांचा जीव कवडीमोल ठरत आहे. हुबळी, धारवाड, गदग या भागातून गोव्याला जाणार्‍या वाहनांची दिवस-रात्र येथून मोठी वर्दळ असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news