KSRTC salary hike: परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनात १२.५० टक्के वाढ

जुलैपासूनचा फरक मिळणार : सुधारित वेतनश्रेणी एप्रिल २०२५ पासून लागू
KSRTC
KSRTC
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनात १२.५० टक्‍क्यांनी वाढ करण्यात आली आहे. बुधवारी (दि.१) सायंकाळी उशिरा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परिवहन कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण झाली आहे.

केएसआरटीसीच्या नियमांनुसार बढती न मिळालेल्या किंवा बढतीसाठी पात्र नसणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सलग १५ वर्षापर्यंत सेवा पूर्ण केली असेल उच्च किंवा मध्यम वेतनश्रेणीत समाविष्ठ केले जाईल. ही सुविधा संपूर्ण सेवा कालावधीत एकदाच उपलब्ध असेल.

१ एप्रिल २०२५ पासून ३० जून २०२६ पर्यंतत्या सुधारित वेतनातील थकबाकी ग्रॅच्युईटीतील फरकाच्या रकमेची गोळाबेरीज करून बिले तयार करण्याची सूचना दिली आहे. ही वेतनवाढ या कालावधीत टप्पाटप्याने दिली जाणार असून या कालावधीत सेवेदरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू आहे.

वेतनवाढीचा फायदा राज्यातील सुमारे १.०५ लाख परिवहन कर्मचाऱ्यांना होणार आहे. यामुळे सरकारवर दरमहा ७२.८० कोटी रूपयांचा अतिरिक्त भार पडेल. , वेतनवाढीसाठी अनेक वेळा बस बंद ठेवून कर्मचार्‍यांनी आंदोलन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news