

बंगळूर : केपीएससीमार्फत ग्रामीण विकास विभागातील सहायक कार्यकारी अभियंता श्रेणी १ पदांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करणारे केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. ते रविवार, दि. ३० रोजी पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री कुमारस्वामी सहायक कार्यकारी अभियंता श्रेणी १ च्या पदांसाठीच्या निवड व भरती प्रक्रियेत तत्कालीन केपीएससी सचिवांनी प्रत्येक टप्प्यावर चुका केल्या होत्या; पात्र उमेदवारांवर अन्याय करण्यासाठी ते हेतुपुरस्सर घोटाळ्यात सामील होते. या पदासाठी अंतिम यादी तयार करताना व पाठवताना त्यांनी कोणत्याही नियमांचे पालन केले नाही. त्यांनी अध्यक्ष व सदस्यांना माहिती न देता एकतर्फी निर्णय घेतला आहे. रोज आरएसएसवर टीका करणाऱ्या खर्गे यांना त्यांच्या विभागात कोणताही भ्रष्टाचार दिसत नाही. त्यांनी परीक्षेत पात्र नसलेल्यांना नोकऱ्या दिल्या आहेत, अशी टीका केली.
तुम्ही बीडीए संघटनेत चुकीचे काम केलेल्या व्यक्तीला आणून केपीएससीचे अध्यक्ष बनवले. त्या व्यक्तीने कोट्यवधी रुपयांच्या पदांचा लिलाव केला. आता तुम्ही ७५ हजार पदे भरणार असल्याचे सांगत आहात. ती पदे अशा बेकायदेशीररीत्या कशी भरणे योग्य आहे का?
प्रियांक खर्गे म्हणाले होते की सत्ता मिळाली तर मी केपीएससी बरखास्त करेन. आता त्यांना सत्ता मिळाली आहे. केपीएससी बरखास्त करा. तुम्ही पूर्वी पंचायत राज व ग्रामीण विकास मंत्री असताना घोटाळा केला आहे. आता गृहमंत्री म्हणून तुम्ही काय केले आहे ते सांगा, असा प्रश्न त्यांनी विचारला.