Satish Jarkiholi | केपीसीसी अध्यक्षांचा निर्णय आधीच झाला होता : मंत्री सतीश जारकिहोळी

मुख्यमंत्रीपदासाठी अध्यक्षपद गरजेचे नाही
Satish Jarkiholi
Satish JarkiholiPudhari
Published on
Updated on

बेळगाव : केपीसीसी अध्यक्षपद माझ्या हातून निसटले नाही तर त्याबाबतचा निर्णय आधीच झाला होता. अन्‌ मुख्यमंत्री होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष असणे आवश्यक नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री सतीश जारकीहोळी यांनी गुरुवारी (दि. ४) पत्रकारांशी बोलताना दिली.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्षपदी सतीश जारकिहोळी यांना आपली वर्णी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आणि काँग्रेस हायकमांडने बी. के. हरिप्रसाद यांची केपीसीसी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भात ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.ते म्हणाले, केपीसीसी अध्यक्षपद माझ्या हातून निसटले असे नाही तर त्याबाबतचा निर्णय आधीच झाला होता. पक्षाच्या एक व्यक्ती, एक पद या निकषानुसार सर्वांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, केपीसीसी अध्यक्षपद मला मिळाले नाही, असे म्हणणे योग्य नाही. याबाबत दोन महिन्यापूर्वी स्पष्ट संकेत देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

आमच्या पक्षात एक व्यक्ती, एक पद हीच भूमिका कायम राहिली आहे. शेवटच्या टप्प्यात माझे मंत्रीपद निश्चित झाले आणि केपीसीसी अध्यक्षपदाची चर्चा थांबली. त्यामुळे, आम्ही या विषयावर शांत राहिलो. सिद्धरामय्या हे केपीसीसी अध्यक्ष नसतानाही मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे, मुख्यमंत्री होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद असणे आवश्यक नाही, असे मंत्री जारकिहोळी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news