Murder Case: खानापूरच्या युवकाचा नेपाळमध्ये खून

उत्तर प्रदेशच्या रूमपार्टनरवर संशय; हल्ल्यानंतर संशयित फरार
Murder Case: खानापूरच्या युवकाचा नेपाळमध्ये खून
Published on
Updated on

खानापूर : खानापूर शहरातील मुस्लिम निंगापूर गल्लीतील युवकाचा नेपाळमध्ये त्याच्याच रूम पार्टनरने चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खानापूर शहरात शोककळा पसरली असून, मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

साहिल रियाजअहमद मोमीन (वय २५) असे युवकाचे नाव असून, या प्रकरणी सद्दाम हुसेन (मूळ रहिवासी उत्तर प्रदेश) याच्यावर खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयित फरार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news