Belgaum Crime : चप्पलवरून भांडण, सुडातून खून

बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला खानापूर तालुक्यात : पूर्ववैमनस्यातून घटना
Murder
Murder
Published on: 
Updated on: 

बेळगाव : चार दिवसांपूर्वी गणपती पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सर्वेश अभिजित कंग्राळकर (वय २७, रा. मारुतीनगर, तिसरा क्रॉस, सांबरा रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चप्पल आगीत फेकल्यावरून वर्षापूर्वी सर्वेशने मित्रावर हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्याच्या उद्देशातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

सर्वेश गणपती पाहायला गेला व तेथून बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याचे वडील अभिजित कंग्राळकर यांनी २१ सप्टेंबर रोजी माळमारुती पोलिसांत दिली होती. तेव्हापासून या तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरू होता. २० सप्टेंबर रोजी रात्री सर्वेश हा गणपती पाहायला गेला होता. तेथून त्याला मंडोळी रोडवरील वाटवे कॉलनी येथे काहींनी बोलावून घेतले. तेथे त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत कारच्या डिकीत कोंबले व तेथून अन्यत्र नेऊन टाकल्याचा संशय व्यक्त होत होता. तो शनिवारी खरा ठरला. त्याचा मृतदेह खानापूर-जांबोटी मार्गावरील मलप्रभा नदीपासून कोकणवाडा गावाजवळ जंगल भागातील निर्जनस्थळी सापडला.

जुन्या वादातून खून

पोलिस गणेशोत्सव बंदोबस्तात असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास अद्याप बाकी आहे. परंतु, शशी नामक तरुण व त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सर्वेश, शशी व त्याच्या अन्य काही साथीदारांनी वर्षापूर्वी हिरेबागेवाडी परिसरात पार्टी केली होती. एकत्र मद्यप्राशन केल्यानंतर शशीने सर्वेशचे चप्पल आगीत टाकले होते. यातून दोघांमध्ये वादावादी झाली व रागाच्या भरात सर्वेशने शशीवर चाकूने हल्ला केला होता. बागेवाडी पोलिसांत या प्रकरणी खुनी हल्ल्याची नोंद झाली होती. हल्ल्याचा राग शशीला होता. यातूनच त्याने पूर्वनियोजन करून सर्वेशला बोलावून घेत त्याच्यावर हल्ला करत खून केल्याचा संशय आहे.

प्रेयसीने बोलावून घेतले?

गणपती पाहण्यासाठी सर्वेश बाहेर पडला तेव्हा मंडोळी रोडला त्याच्या प्रेयसीने तेथे बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शशी किंवा त्याच्या साथीदारांनी बोलावल्यानंतर सर्वेश येणार नाही, याची खात्री असल्याने त्यांनी त्याच्या प्रेयसीला धमकावून त्याला फोन करायला लावल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

पोलिसांकडून ताब्यात पण....

सर्वेश बेपत्ता असलेल्या दिवसापासून पोलिसांकडून शोध सुरू होता. त्याचे अपहरण व मारहाण झाल्याचा संशय वडगाव व माळमारुती पोलिसांना होता. दोन पथकेही तयार केली होती. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनच मृतदेह नेमका कुठे टाकला गेला ही माहिती घेऊन पोलिसांनी तो ताब्यात घेतल्याचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news