10th topper: खानापूरच्या कन्येने रचला इतिहास

फेरमूल्यांकनात ६२५ पैकी ६२५ गुण : दहावीत राज्यात पहिली येण्याचा मान
10th topper: खानापूरच्या कन्येने रचला इतिहास
Published on
Updated on

खानापूर : झुंजवाड (के.एन.) ता. खानापूर येथील दिव्या प्रदीप देसाई हिने आपल्या चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. फेरमूल्यांकनानंतर तिने 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला.

दहावी परीक्षेच्या प्राथमिक निकालात दिव्याला 625 पैकी 624 गुण मिळाले होते. सर्व विषयांत शंभर पैकी शंभर गुण मिळवतानाच इंग्रजी विषयात 125 पैकी 124 गुण मिळाल्याने ती राज्यात द्वितीय स्थानी होती. मात्र आपल्या उत्तरपत्रिकेबाबत तिला पूर्ण खात्री होती. त्यामुळे फेरमूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला.

पुनर्तपासणीनंतर इंग्रजी विषयातही तिला पूर्ण १२५ पैकी १२५ गुण प्रदान करण्यात आले. यामुळे तिच्या एकूण गुणसंख्येत वाढ होऊन ती ६२५ पैकी ६२५ गुणांसह राज्यात संयुक्त अव्वल ठरली. गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news