Missing girl body found: केरळच्या बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला दरीत

चंद्रद्रोण पर्वतरांगेतील माणिक्यधारा धबधब्याजवळ गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या केरळच्या 14 वर्षीय श्रीनंदाचा मृतदेह शुक्रवारी (दि. 10) सापडला
Missing girl body found
Missing girl body found: केरळच्या बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला दरीतPudhari
Published on
Updated on

धारवाड : चंद्रद्रोण पर्वतरांगेतील माणिक्यधारा धबधब्याजवळ गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या केरळच्या 14 वर्षीय श्रीनंदाचा मृतदेह शुक्रवारी (दि. 10) सापडला. तिचा मृतदेह दोन हजार फूट खोल दरीत आढळला.

श्रीनंदा 7 एप्रिल रोजी केरळहून चिक्कमगळूर शहरात आलेल्या 40 जणांच्या पर्यटक गटाचा भाग होती. इनामु दत्तात्रेय पीठ आणि माणिक्यधाराला भेट देत असताना ती अचानक बेपत्ता झाली होती. या घटनेनंतर पोलिसांच्या एका पथकाने तिचा शोध सुरु केला होता. शोधासाठी पोलिसांनी एसडीआरएफ, अग्निशामक दल व एएनएफसमवेत संयुक्त मोहीम राबवली. घनदाट जंगल आणि तीव्र डोंगराळ प्रदेशामुळे ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात आला.

सलग तीन दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर शुक्रवारी माणिक्यधारा येथील सर्वात खोल दरीच्या तळाशी मुलीचा मृतदेह सापडला. मुलगी अपघाताने घसरुन पडली की यामागे दुसरे काही कारण होते, याचा तपास सुरु आहे. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news