Fight Over Dancing | नाचताना पाय लागल्याने तलवार हल्ला

Kasai Galli sword attack | कसाई गल्लीतील घटना : तिघा अल्पवयीन युवकांवर गुन्हा
Fight Over Dancing
बेळगाव : हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी भेट देऊन पाहणी केली. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

बेळगाव : मोहरमनंतर कवडीपीर मिरवणूक काढली जाते. ती शुक्रवारी रात्री निघाली असातना नृत्य करताना एकाचा पाय दुसर्‍याला लागल्याचे निमित्त होऊन एका अल्पवयीन युवकावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. त्यात तो युवक गंभीर जखमी असून, मार्केट पोलिसांनी तिघा अल्पवयीन युवकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहरमनंतर मुस्लिम समाजातील अल्पवयीन युवकांकडून कवडीपीर मिरवणूक काढली जाते. यामध्ये सर्व अल्पवयीन युवक सहभागी होत असल्याने याला ‘छोटा पीर’ असेही म्हटले जाते. शुक्रवारी रात्री ही मिरवणूक निघाली होती. डॉल्बी लावून युवक जल्लोष करत होते.

तथापि, मिरवणूक कसाई गल्लीत आली असता नृत्यावेळी एका युवकाचा पाय दुसर्‍या युवकाला लागला. यातून दोन युवकांमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी दुसर्‍या गटातील तिघांनी रेहान अस्लम मुजावर (वय 16, रा. न्यू गांधीनगर) या युवकावर तलवारीने हल्ला केला. त्याच्या डोकीत व पाठीत तलवारीने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Fight Over Dancing
Belgaum Crime : दारूच्या नशेत वेदगंगा नदीत तरूणाची उडी; २६ दिवसांनी सापडला मृतदेह

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एन. व्ही. बरमणी व सहकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मार्केट पोलीस ठाण्यात संशयितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मार्केटचे निरीक्षक महांतेश धामण्णवर, उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर व संशयित तिघा अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धारदार तलवारही जप्त केली. रात्री उशिरापर्यंत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. निरीक्षक धामण्णवर तपास करीत आहेत.

Fight Over Dancing
Belgaum Crime : दारूच्या नशेत वेदगंगा नदीत तरूणाची उडी; २६ दिवसांनी सापडला मृतदेह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news