

कारवार : जेवणासाठी दुचाकीवरून निघालेल्या मेडिकलच्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला रस्त्यावर अचानक आलेल्या हत्तीने धडक दिल्याने दुचाकी घसरून एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात माशा गावाजवळ घडली आहे. हे दोघेही कारवार कारवार मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते देोघेही मूळचे गोकाकचे आहेत.
आदर्श पुजारी (23) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर तर रौनक चावला जखमी झाला आहे. हे दोघे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. मंगळवारी रात्री ते जेवायला जात असताना अंधारात त्यांना हत्तीने धडक दिली. अपघातानंतर दोघांनाही स्थानिकांच्या मदतीने ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र आदर्शला मृत घोषित करण्यात आले. पोलिस तपास करत आहेत.