

अंकली : शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा धक्का लागून तो कृष्णा नदीत पडला. रायबाग तालुक्यातील खेमलापूर गावात ही घटना घडली.
या घटनेनंतर तो बेपत्ता झाला असून अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिकांच्या सहकार्याने कृष्णा नदीच्या पात्रात त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कुडची पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून बसवराज ऐनापूर हा तरुण कृष्णा नदीच्या काठावर मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा धक्का लागला. त्यामुळे तो नदीत पडून बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.