

विजापूर : पती-पत्नी आणि एका चिमुकल्या मुलीचा ५ वर्षांचा सुखी संसार. पण परपुरुषाशी असलेल्या कथित प्रेमसंबंधाच्या मोहापायी पत्नीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी इंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
तक्रारीनुसार भाग्यश्री बडिगेर हिने तिचा प्रियकर दीपक नावाडी याच्या सांगण्यावरून पती अरुणकुमार बडिगेर (वय २८) यांचा खून केला. ही घटना ६ मे रोजी घडल्याचा आरोप असून तब्बल अडीच महिन्यांनंतर तिच्या मोबाईलमधील चॅटिंग, व्हिडीओ कॉलचे स्क्रीनशॉट आणि अन्य पुरावे समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.