Karnataka voter list: मतदार यादीत नाव, तरच ‘हमी’ला वाव!

एसआयआर सुरू, नाव नसल्यास योजनांचा लाभ नाही
Voter List
Voter List Pudhari
Published on
Updated on

बंगळूर : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे सुरू असलेल्या मतदार यादी सुधारणेमध्ये (एसआयआर) आपली नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. अन्यथा ज्यांची नावे मतदार यादीत नसतील, त्यांना हमी योजनांचा लाभ मिळणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री शिवकुमार यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत विहीत नमुन्यात स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा तपशील भरून मंगळवारपासून एसआयआर प्रक्रियेचा आरंभ केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बिहार व पश्चिम बंगालमध्ये ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांची नावे सरकारी लाभ योजनेतून कमी केली जात आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकातही ज्यांची नावे मतदार यादीत नसतील त्यांना हमी योजना मिळू शकणार नाहीत. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी आपली नावे एसआयआरमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news