Karnataka Accident : वडगावच्‍या कारला चोर्ला घाटात अपघात; एक ठार

आणखी काहीजण अडकल्याची भीती; धडकेनंतर डंपरने फरफटत नेले, कारचा चक्काचूर
Accident
AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

खानापूर : डंपर आणि कार यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाल्याचा अंदाज आहे. अपघातात कार पूर्णपणे चेपल्याने आत कितीजण अडकले आहेत, याची नेमकी माहिती मिळणे पोलिसांना रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती.

मंगळवारी (दि. २९) रात्री बेळगाव-चोर्ला मार्गावर डेल्टा रिसॉर्टजवळ हा अपघात झाला. बेळगावमधून कटर मागवून पत्रे कापून कितीजण आत आहेत आणि ते कोण आहेत, याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी रात्री १० पर्यंत शर्थीचे प्रयत्न चालविले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जांबोटीतून गोव्याकडे जाणारा डंपर आणि गोव्याहून बेळगावकडे येणारी कार यांच्यात ही धडक झाली. धडकेनंतर डंपरने कारला फरफटत नेल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. या भीषण धडकेत कार रस्त्यावरच पूर्णपणे चेपली असून तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारमध्ये आणखी प्रवासी अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

अपघातग्रस्त कार बेळगावातील वडगाव येथील व्यक्तीची असल्याचे समजते; मात्र प्रवाशांची नेमकी संख्या आणि त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाल्याने आतील प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बेळगाव येथून वाहन कापण्याचे कटर मागविण्यात आले आहे. दरम्यान, वडगाव येथील संबंधितांचे नातेवाईक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अपघातातील मृतांची संख्या, जखमींची स्थिती आणि घटनेबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिस उपनिरीक्षक निरंजन स्वामी, उपनिरीक्षक सपाटे यांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news