Karnataka Accident: कृष्णा नदीत टिप्पर कोसळला; चालक ठार

टिप्परच्या केबिनमध्ये अडकलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला
Karnataka Accident: कृष्णा नदीत टिप्पर कोसळला; चालक ठार
Published on
Updated on

विजापूर : विजापूर-हुबळी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वरील कोल्हार पुलावरून कृष्णा नदीत कोसळलेला टिप्पर 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. टिप्परच्या केबिनमध्ये अडकलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला.

१ जुलै रोजी टिप्पर आणि कार यांच्यात ओव्हरटेक करताना झालेल्या धडकेनंतर टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन पुलावरून थेट कृष्णा नदीत कोसळला. या अपघातानंतर चालक संतोष कोटी बेपत्ता झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिस, अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सलग 3 दिवस शोध मोहीम राबविली.

शुक्रवारी क्रेनच्या सहाय्याने टिप्पर नदीतून बाहेर काढण्यात आला. त्यावेळी टिप्परच्या आत चालक संतोष कोटी यांचा मृतदेह आढळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news